2023-24 Glimpses of Activities
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या हुजूरपागा, लक्ष्मी रोड शाखेत ७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला .
या सोहळ्यात ध्वजारोहण हुजूरपागा, श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी म. ग. ए. संस्थेच्या अध्यक्षा मा. शालिनीताई पाटील, एच. एच. सी. पी. कनिष्ठ विद्यालय मुख्याध्यापिका श्रीमती विनिता फलटने, सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियदर्शनी पुरोहित, मराठी माध्यम मुख्याध्यापिका श्रीमती अनघा रानडे, सौ. अश्विनी अरुण देवस्थळी प्रि-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंकाईकर व रँग्लर र.पु. परांजपे शाळेच्या श्रीमती जवळीकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजवंदन व राष्ट्रगीत गायन झाले व राष्ट्र ध्वजाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली .